नागपंचमी निमित्त शिवसेनेच्या वतीने भाविक भक्तांना खिचडी फराळाचे वाटप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
नागपंचमीच्या पावन पर्वानिमित्त शिवसेना पक्षाच्या वतीने, लोकसभा संघटक मा. मुकेशजी जिवतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली, भाविक भक्तांसाठी खिचडी फराळाचे भव्य आयोजन करण्यात आले. हे वाटप शिवसेना जनसंपर्क कार्यालयासमोर भक्तिभावपूर्ण वातावरणात पार पडले.
या कार्यक्रमात माजी नगरपरिषद उपाध्यक्ष प्रफुल चटकी, माजी नगरसेवक सुधीर सातपुते, राजू सारंगधर, चंद्रकांत खारकर, रेखा खुटेमाटे, अनिता मुळे, शोभा पारखी, शितल गेडाम, प्रतिभा सोनटक्के, आशा निंबाळकर, लक्ष्मी पारखी, प्रफुल सारवण, सुनीता टिकले आदी महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची विशेष उपस्थिती लाभली.
यासोबतच नकुल शिंदे, महेश जिवतोडे, नितिन कवासे, प्रमोद गेडाम, दिनेश यादव, सुधाकर मिलमिले, जावेद शेख, अनिकेत काळे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी केला.
या उपक्रमाच्या माध्यमातून शिवसेनेने सामाजिक जाणीव आणि भक्तांच्या सेवेसाठीची आपली बांधिलकी अधोरेखित केली. कार्यक्रमाला भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.