अल्ट्राटेक सीमेंट लिमिटेड, आवारपूर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, आवारपूर अंतर्गत अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन, आवारपूर आपल्या सामाजिक दायित्वांच्या कार्याव्दारे शिक्षणाची गुणवत्ता आणि विद्यार्थांचे मनोबल वाढावे हे लक्षात घेता सभोवतालील १२ गावातील १० वी व १२ वीच्या एकूण २१ गुणवंत विद्यार्थ्यांंचा सत्कार ३० जुलै ला करण्यात आला.
यात १० वीच्या मराठी, इंग्लिश व सेमी इंग्लिश तर १२ वी च्या कला, विज्ञान, वाणीज्य व एम.सी.व्ही.सी. शाखेतील विद्यार्थ्यांंचा सहभाग होता. या कार्यक्रमाला श्रीराम पी. एस. (युनिट हेड, दिपक सुराणा (टेक्निकल फंक्शन हेड), सौदीप घोष (माईन्स- फक्शंन हेड), नमित मिश्रा (मानव संसाधन विभाग – फंक्शन हेड), अमित सिंह, शशि रंजन कुमार, किरण करमरकर तसेच शिक्षक वृंद व पालक वर्ग उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी मोलाचे मार्गदर्शन केलेत व सत्कार केला.
कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन सी.एस.आर. विभाग प्रमुख प्रतीक वानखेडे यांनी केले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरीता संजय ठाकरे व देविदास मांदाळे यांनी अथक परिश्रम केले.