जागतिक बाल/मानव तस्करी विरोधी दिनानिमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन
बल्लारशाह रेल्वे स्थानकावर चाईल्ड हेल्पलाईन 1098 व बालहक्कांची माहिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
बल्लारशाह : जागतिक बाल व मानव तस्करी विरोधी दिनानिमित्त बल्लारशाह रेल्वे स्थानकावर भव्य जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
जिल्हा महिला व बाल विकास विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्पलाईन 1098, हृदय संस्था, RPF व GRP यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दशरथ सिंह (स्टेशन प्रबंधक, बल्लारशाह), मीनाक्षी भस्मे (जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, चंद्रपूर), अजय साखरकर (जिल्हा बाल संरक्षण अधिकारी), अधिवक्ता क्षमा बासरकर (अध्यक्ष, बालकल्याण समिती, चंद्रपूर), रव्हेंद्र सिंग (RPF सहायक निरीक्षक), अखिलेश चौधरी (GRP), श्री शशिकांत मोकासे (हृदय संस्था, क्षेत्रीय अधिकारी), सौ. सोनाली ताजने, काशिनाथ देवगडे (डायरेक्टर, हृदय संस्था गडचिरोली), प्रिया पिंपळशेडे (समुपदेशक, जिल्हा बाल संरक्षण कक्ष) आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमांतर्गत प्लॅटफॉर्मवर रॅलीचे आयोजन करून घोषवाक्यांच्या माध्यमातून प्रवाश्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. प्रवाशांना चाईल्ड हेल्पलाईन 1098, बालहक्क व मानव तस्करी प्रतिबंध याविषयी माहिती देण्यात आली.
विशेषतः लहान मुलांना चॉकलेट व बलूनचे वाटप करण्यात आले, ज्यामुळे वातावरण उत्साही झाले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी धर्मेंद्र मेश्राम, सुरेंद्र धोडरे, त्रिवेणी हाडके, विजय अमर्थराज, बबीता लोहकरे, सोनम लाडे, लक्ष्मी भोयर, राणी मेश्राम, प्रिया कांबळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.