ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

व्हॉईस ऑफ मेलोडीचेर सुवर्ण महोत्सव होणार साजरा

कार्यक्रमात अनेक सुमधुर गाण्यांचे होणार प्रस्तुतीकरण

चांदा ब्लास्ट

श्री बंडूजी देठे यांच्याद्वारे स्थापित व संचलित व्हॉईस ऑफ मेलोडी या ऑर्केस्ट्राला ५० वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्ताने व्हॉईस ऑफ मेलोडीचेर सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात येत आहे.

व्हॉईस ऑफ मेलोडी या ऑर्केस्ट्रा ने चंद्रपूर व अन्य जिल्ह्यात असंख्य यशस्वी संगीताचे कार्यक्रम संपन्न केले आहे. हे ऑर्केस्ट्रा आपल्या गाण्यांची विशेष शैली व सुमधुर प्रस्तुती करिता प्रसिद्ध आहे.

या कार्यक्रमात ऑर्केस्ट्राच्या वरिष्ठ सदस्य व अन्य कलाकारांचे सत्कार करण्यात येणार आहे. हे कार्यक्रम दिनांक ३१ जुलै सायंकाळी ०७ वाजता प्रियदर्शिनी सभागृह येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमात अनेक सुमधुर गाण्यांचे प्रस्तुतीकरण होणार आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येत या कार्यक्रमात उपस्थित व्हावे असे आव्हान आयोजकांनी केले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीपणे संपन्न व्हावे या करिता चंद्रपूर येथील अनेक नामवंत नागरिकांनी शुभेच्या दिल्या आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये