ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भाजपा नेते सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्‍या वाढदिवसानिमीत्‍त महाराष्‍ट्र ऑटोरिक्षा चालक-मालक संघटनेतर्फे रक्‍तदान शिबीराचे आयोजन

चांदा ब्लास्ट

महाराष्‍ट्र राज्‍याचे माजी अर्थमंत्री, लोकनेते आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्‍या ६३ व्‍या वाढदिवसाचे औचित्‍य साधुन दिनांक ३० जुलै २०२५ रोजी महाराष्‍ट्र ऑटोरिक्षा चालक-मालक संघटना तसेच छत्रपती युवा फाऊंडेशन यांच्‍यावतीने रक्‍तदान शिबीराचे आयोजन करण्‍यात आले आहे. स्‍थळ – खेळूले कुणबी समाज, एस.टी. वर्कशॉपजवळ, दे.गो. तुकूम, चंद्रपूर येथे आयोजित केलेल्‍या शिबीराचे उद्घाटन सकाळी १०.०० ते ५.०० वा. पर्यंत चालेल. रक्‍तदान करणा-या व्‍यक्‍तीला आ. मुनगंटीवार यांच्‍यातर्फे उत्‍कृष्‍ट भेटवस्‍तु वितरीत करण्‍यात येणार आहे.

तरी चंद्रपूर शहरातील ऑटोरिक्षा चालक-मालकांनी मोठया संख्‍येने रक्‍तदान करावे, अशी विनंती करण्‍यात येत आहे. तसेच चांगुणाबाई मुनगंटीवार ऑटोरिक्षा म्‍हाडा कॉलनी दाताळा, चंद्रपूर येथे सायं. ५.०० वा. वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्‍यात आले आहे, असे संघटनेचे संस्‍थापक अध्‍यक्ष राजेंद्र खांडेकर, जिल्‍हाध्‍यक्ष मधुकर राऊत, जिल्‍हा सचिव सुनिल धंदरे, जिल्‍हा उपाध्‍यक्ष विनोद चन्‍ने, जहीर शेख, जाकीर शेख, कुंदन रायपुरे, रवि आंबटकर, राजू मोहुर्ले, मंगेश चवरे, सुधाकर बिसने, बंडू भगत, शंकर थोरात, शंकर घुमाडे, किशोर वाटेकर, रमेश वजे, विलास बावणे, नरेंद्र आसवले व असंख्‍य चालक मालकांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये