हेटी पुलावरील तो खड्डा ठरतोय जीवघेणा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
कोरपना.ता.प्र. – कोरपना ते वणी राज्य महामार्गावरील हेटी गावाजवळच्या नाल्यावरील पुलावर मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्या दृष्टीने बांधकाम विभागाने खड्ड्याची डागडुजी करावी अशी मागणी होते आहे.
चंद्रपूर यवतमाळ जिल्ह्याला जोडणारा हा महत्वपूर्ण मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावरून दिवस रात्र अवजड व सामान्य वाहतूक होते. परंतु मागील दोन महिन्यापासून या छोटे खाणी पुलावर जीवघेणा खड्डा पडल्याने किरकोळ अपघात घडत आहे.
रात्रीच्या वेळेस तर स्थिति अधिकच गंभीर होते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने खड्डा तुडुंब भरून राहतो. खड्डा नेमका किती खोल आहे याचा अंदाज सुद्धा येत नाही. या अनुषंगाने पुलावरील खड्ड्याची डागडुजी करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. तसेच तुकडोजी नगर ते जिल्हा सीमा पर्यंत झालेल्या रस्त्याची दुर्दशा दूर सारण्यात यावी. जेणेकरून वाहतूकदारांना प्रवास करणे सोयीचे ठरेल