श्री संत शिरोमणी सावता महाराज समाधी सोहळा उत्साहात संपन्न
श्री संत सावता महाराजांची पालखी मिरवणूक शहरातून निघाली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
श्रीसंत शिरोमणी सावता महाराज समाधी सोहळा निमित्त देऊळगाव राजा शहरातील श्री संत सावता महाराज मंदिर माळीपुरा येथे सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.सावता महाराज पुण्यतिथी निमित्त देऊळगाव राजा शहरातून श्री संत सावता महाराज यांची पालखी मिरवणूक वाजत गाजत काढण्यात आली. यामध्ये भक्तगण मोठ्या संख्येमध्ये सहभागी झाले होते. टाळ मृदुंग पताका टाळकरी वारकरी यांच्या गजराने श्री बालाजी नगरी दुमदुमून गेली.आमदार मनोज कायंदे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली .ह भ प संत चरणदास निकम गुरुजी यांचे काल्याचे किर्तन संपन्न झाल्या नंतर महाप्रसादाने उत्सवाची सांगता झाली. हजारो भाविक भक्तांनी यावेळेस महाप्रसादाचा लाभ घेतला. सदर उत्सवाचे आयोजन हे श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर उत्सव समिती , युवा उत्सव समिती -सर्व समाज बांधव’ भाविक भक्त माळीपुरा यांनी केले.
सकाळी सूर्योदयी बंडूभाऊ गोडेकर यांच्या हस्ते अभिषेक व पूजा करण्यात आली .ह भ प संत चरणदास निकम गुरुजी यांचे काल्याचे किर्तन संपन्न झाले .त्यानंतर श्री सावता महाराजां चा चांदीचा मुखवटा पुष्पाने सजवलेल्या पालखीत विराजमान करून शहरातून नगर प्रदक्षिणा करण्यात आली.या मिरवणुकीत टाळ,मृदुंग, पताका ‘टाळकरी,वारकरी ‘यांच्यासह समाज बांधव भगिनी ‘सावता भक्त,भजनी मंडळ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.ग्रामदैवत श्री बालाजी महाराज मंदिराचे दर्शन घेऊन श्री ची पालखी ही संत सावता मंदिर येथे पोहोचली.यावेळेस आमदार मनोजभाऊ कायंदे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली .श्री संत सावता महाराज मंदिरामध्ये माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर, नगरपरिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी अरुण मोकळ, यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे नेते व पदाधिकारी कार्यकर्ते व सामाजिक शैक्षणिक अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी श्रीसंत सावता महाराज मूर्तीचे दर्शन घेतले.यानंतर महाप्रसादाचा लाभ हजारो भक्तांनी घेतला
श्रीसंत शिरोमणी सावता महाराज समाधी सोहळा निमित्त दिनांक 16 जुलै ते 23 जुलै सप्ताह चेश्री संत सावता महाराज मंदिर उत्सव समितीच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.यामध्ये श्री संत सावता महाराज चरित्र ग्रंथाचे वाचन ह. भ प वैभव महाराज झोरे यांनी केले.ज्ञानेश्वरी पारायण ह भ प अनिल महाराज सपाटे व ह भ प सुरज महाराज कव्हळे यांनी केले.दररोज सायंकाळी हरिपाठ व हरिकीर्तन संपन्न झाले. सप्ताहात हरी कीर्तनामध्ये ह भ प बळीराम महाराज , ह भ प ऋषी महाराज शिंदे,ह भ प कृष्णा महाराज कव्हळे ‘ह भ प भगवान महाराज गाडेकर , ह भ प व वैष्णवदास भिकाजी महाराज मोठे ‘ ,ह भ पराजू महाराज खराडे ह भ प पांडुरंग महाराज वाघमारे व काल्याचे किर्तन ह भ प संत चरणदास निकम गुरुजी यांनी केले.याकिर्तन सोहळ्यात टाळकरी वारकरी गायनाचार्य मृदुंगाचार्य व भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
श्री संतशिरोमणी सावता महाराज समाधी सोहळ्याचे आयोजन श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर उत्सव समिती,युवा उत्सव समिती,समाज बांधव भगिनी व सावताभक्त माळीपुरा यांनी केले होते.संपूर्ण उत्सवाचे सूत्रसंचालन ह भ प सुरज गुप्ता यांनी केले