प्रेरणा महाविद्यालयात लोकमान्य टिळक जयंती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे महान सेनानी, ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ असा नारा देणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती प्रेरणा प्रशासकीय महाविद्यालयात मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली.
जयंती निमित्य महाविद्यालयातर्फे वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि व्याख्याने आयोजित करण्यात आली. सदर कार्यक्रमाला युगचेतना ग्रामविकास बहुदेशीय संस्थेचे उपाध्यक्ष अरविंद मुसने अध्यक्ष म्हणून उपस्थित होते .तर महाविद्यालयाचे प्राचार्य नानेश्वर धोटे, प्रा. प्रवीण आंबटकर,प्रा. अंजना पवार, प्रा. सचिन धनवलकर, प्रा, दुर्गावती कुबाळकर यांची प्रमुख प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.सर्व प्रथम मान्यवरच्या हस्ते टिळकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमात टिळकांचे सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय योगदान यावर प्रकाश टाकण्यात आला. विद्यार्थ्यांनी टिळकांच्या विचारांवर आधारित भाषणे दिली. टिळकांचे कार्य आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असून त्यांच्या विचारांचा प्रसार होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अरविंद मुसने यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून केले. प्राचार्य नानेश्वर धोटे यांनी लोकमान्य टिळकाच्या कार्यातून आपल्याला स्वदेशप्रेम,निर्भयता,आणि सत्यासाठी लढण्याची प्रेरणा मिळते असे प्रतिपादन केले.
प्रा.प्रवीण आंबटकर, प्रा, दुर्गावती कुबाळकर यांनी विध्यार्थ्यांना टिळकाच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा. अंजना पवार यांनी केले. संचालन तन्वी पोटदुखे हिने तर,साक्षी गुरनुले हिने आभार व्यक्त केले.