चंद्रपूरातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांना स्थगिती
येत्या काही दिवसांत सर्व पदे जाहीर करण्यात येईल - संदीप गिऱ्हे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेंद्र मर्दाने
वरोरा : चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, राजुरा व चिमूर या विधानसभा क्षेत्रातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या ‘सामना’ मध्ये ५ जून रोजी जाहीर झाल्या होत्या. त्या नियुक्त्यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने स्थगित करण्यात आल्या आहेत. पक्षाचा हा आदेश हा अंतिम आदेश मानावा लागेल. या आदेशानंतरही जो कोणी या पदांचा किंवा नियुक्ती पत्राचा (लेटरचा) गैरवापर करताना आढळेल, त्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असून त्या व्यक्तीला पदापासून ताबडतोब वंचित राहावं लागेल. येत्या काही दिवसांत सर्व पदे जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना ( उ.बा.ठा.) चंद्रपूर जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी वरोरा विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
गिऱ्हे पुढे म्हणाले की, शिवसैनिक म्हणून ज्यांनी कधी आंदोलन केले नाही त्यांना शिवसेना जिल्हाप्रमुख पद देण्यात आले. त्यामुळे कट्टर शिवसैनिकात नाराजी होती ही नाराजी शिवसैनिकांनी वेळोवेळी वरिष्ठांना बोलूनही दाखविली. त्यामुळे क्षेत्रात शिवसेना दुभंगली. आता जुन्या नियुक्त्यांना स्थगिती दिल्याने विदर्भ संपर्क प्रमुख प्रशांत कदम यांच्या अहवालानुसार गेलेल्या नावातूनच निवड कट्टर शिवसैनिकाची निवड करण्यात येईल. पक्षाच्या अंतर्गत शिस्तप्रक्रियेचा हा निर्णय महत्त्वाचा ठरत असून, पदनियुक्तीच्या प्रक्रियेतील पारदर्शकता राखण्याचा हा प्रयत्न आहे.
नवीन नियुक्त्यांबद्ल बोलताना अहवालात नमूद नमूद केलेल्या जुन्या कट्टर शिवसैनिकाच्या नावावरती पक्षप्रमुखांनी विचार करावा. नवीनच आलेला अथवा बाहेरचा उमेदवार शिवसैनिकावर जिल्हाप्रमुख म्हणून पुन्हा लादल्यास पुन्हा पक्ष फुटीची भीती शिवसैनिकांनी व्यक्त केली.
पत्रकार परिषदेत जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे, शिवसैनिक दत्ता बोरेकर, मनीष जेठांनी, वैभव डहाणे, बंडू डाखरे, अमित निब्रड, गणेश जानवे आदी उपस्थित होते.