ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दुचाकी- ट्रकच्या अपघातात युवक ठार

तीन चिमुकले झाले पोरके

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

 सावली व व्याहाड खुर्द येथे रात्रपाळीला गुरख्याचं काम करीत असलेला युवक अनिल विश्वकर्मा वय 32 वर्ष हा दिनांक 23 ला रात्रौ साडेसातच्या दरम्यान व्याहाड खुर्दवरून सावलीला येत असताना चंद्रपूर गडचिरोली मुख्य मार्गावरील टोल नाक्या जवळील धाब्याजवळ एक उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिल्याने त्याच्या जागीच मृत्यू झाल्या त्याचा मृत्यूची बातमी कळताच परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे चंद्रपूर गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर छत्तीसगड येथील ट्रक क्रमांक Cg 08 av 0811 हा ट्रक नादुरुस्त असल्याचे सांगून रस्त्यावर उभा ठेवलेला होता.

ट्रक रस्त्यावर ठेवून त्याने कोणत्याही प्रकारचे इंडिकेटर अथवा सूचना न देता हयगयीने ठेवल्याने मागून येणाऱ्या दुचाकी Mh 34 ca 6585 टू व्हीलर वर चालविणारा अनिल विश्वकर्मा याला पावसामुळे समोरील ट्रक न दिसल्याने त्यावर धडकला त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती सावली पोलिसांना कळताच घटनास्थळी दाखल झाले व पाहणी केली असता हा सावली शहरातील गुरखा निघाला.त्याचा मृतदेह सावली येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. त्या ठिकाणी पत्नी व 3 चिमुकल्या च्या अक्रोशाने मन हेलावून गेले.गुरखा म्हणून काम करीत असलेला अनिल हा प्रेमळ स्वभावाचा होता. त्याला पत्नी, दोन मुली,1 मुलगा आहे.

कमवता आधार गेल्याने अनेकजण हळहळ व्यक्त करीत असून आज दिनांक 24 ला रात्रौ त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.सावली पोलिसांनी ट्रक ला ताब्यात घेऊन ट्रक चालकाला अटक केली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये