ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात सार्वजनिक लोकहिताच्या कामांना गती

रोजगार हमी योजनेअंतर्गत 5 कोटी 43 लाख 20 हजार रुपयांचा निधी वितरित

चांदा ब्लास्ट

बल्लारपूर विधानसभेतील अपूर्ण कामांसाठी निधी मंजूर

राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रभावी नेतृत्वात जिल्ह्यातील लोकहिताच्या सार्वजनिक कामांना गती मिळाली आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) बल्लारपूर विधानसभेतील पोंभुर्णा, मूल व बल्लारपूर तालुक्यातील अपूर्ण सार्वजनिक कुशल कामांसाठी 5 कोटी 43 लाख 20 हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

या निधीमुळे स्थानिक पातळीवरील विविध सार्वजनिक कामांना गती मिळणार असून, ग्रामस्तरावर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे. तसेच निधीच्या प्रभावी वाटपामुळे गावांमधील मूलभूत तसेच पायाभूत सुविधांशी संबंधित कामे पूर्णत्वास जाणार आहेत.

ही निधी आयुक्तालय स्तरावरून प्राप्त निर्देशांनुसार व केंद्र शासनाच्या सूचनांच्या आधारे पोंभुर्णा, मूल व बल्लारपूर तालुक्यांतील अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी मंजूर करण्यात आला आहे.

हा निधी गावाच्या समृद्ध भविष्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.याशिवाय ग्रामीण भागातील जीवनमान उंचावण्यासाठी आणि स्थानिक स्तरावरच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हा निधी उपयुक्त ठरणार आहे.आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात सतत विकासाची गती राखली गेली आहे.गावागावात समृद्धी यावी यासाठी ते सातत्याने पाठपुरावा करत असून, बल्लारपूर विधानसभा समृद्ध करण्यासाठी ते नेहमीच कटिबद्ध आहेत.

यामुळे निधीच्या प्रभावी वापरामुळे पायाभूत सोयीसुविधांमध्ये वाढ होऊन गावांमधील सर्वसामान्य लोकांचे जगणे सुसह्य होणार आहे, असा विश्वास व्यक्त होत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये