निर्माणी वसाहतीतील कार्टरमध्ये दोन अस्वलांचा ठिय्या
वनविभागाने जंगलात पिटाळले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
वाघ, बिबट्यांचे नित्य दर्शन होणाऱ्या भद्रावती शहरातील निर्माणी वसाहतितील कार्टरमधे दिनांक 23 ला अस्वलाच्या दोन पिलांनी आपला ठिय्या मांडल्याने कार्टर परिसरातील नागरिकांची काही काळ चांगलीच तारांवर उडाली.
या घटनेची माहिती भद्रावती वनविभागाला मिळाल्यानंतर वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने घटनास्थळी जाऊन कार्यवाही करीत या अस्वलाच्या दोन्ही पिलांना सुरक्षित रित्या लगतच्या जंगलात पिटाळले. काही दिवसांपूर्वी निर्माणी वसाहत परिसरात एक आजारी मादी अस्वल आढळून आले होते. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. याच अस्वलाचे हे दोन्ही पिल्ले असावेत असा अंदाज व्यक्त होत आहे.
आयुध निर्माणी वसाहतीतील कार्टर नंबर १७ टाईप ३,सेक्टर ६ या कार्टरमध्ये अस्वलीच्या पिलाच्या या दोन भावंडांनी आपला ठिय्या मांडला होता. वनविभागाच्या पथकाने फटाके फोडून या दोन्ही पिलांना लगतच्या जंगलात पिटाळून लावले. सदर रेस्क्यू कार्यवाई वनविभागाच्या विकास शिंदे, पारवे, किशोर मडावी, राऊत आदींनी केली.