आदर्श हिंदी विद्यालयात मानसिक आरोग्य जनजागरुकता कार्यक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
आदर्श हिंदी विद्यालयात अल्ट्राटेक माणिकगडच्या सीएसआर (CSR) उपक्रमांतर्गत मानसिक आरोग्य जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन 23 जुलै रोजी करण्यात आले.
शारीरिक आजारांप्रमाणेच मानसिक आजार देखील मानवी जीवनासाठी घातक आहेत. आज समाजातील प्रत्येक घटक या मानसिक आजारांचा सामना करत आहे. आजचे विद्यार्थी हे उद्याचे भविष्य आहेत, त्यामुळे त्यांना अशा मार्गदर्शनाची अत्यंत आवश्यकता आहे, जे त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाचे ठरेल. अल्ट्राटेक माणिकगड विद्यार्थ्यांसाठी नेहमीच असे अनेक उपक्रम राबवत असते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शिका डॉ. सना यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या कार्यक्रमाचा विद्यार्थ्यांना नक्कीच लाभ होईल अशी आशा आहे. या कार्यक्रमाचे संचालन श्री अनंत काळे यांनी केले.
तसेच, आदर्श हिंदी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉ. मंजुषा मत्ते यांनीही कार्यक्रमाबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. प्रास्ताविक सोनाली ठाकरे (अल्ट्राटेक माणिकगड कर्मचारी) यांनी केले, तर शिक्षक श्री. पुरुषोत्तम निब्रड यांनी कार्यक्रमाचे आभार मानले
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वैशाली हरकंडे, अनिल भारती, सुनीता काकडे, नीता सिंग आणि पुरुषोत्तम बोरिकार यांनी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमाचे आयोजक अल्ट्राटेक माणिकगडचे कर्मचारी श्री. संगीत चांदेकर* आणि सोनाली ठाकरे* यांनी अथक प्रयत्न केले.