ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जैन मंदिरात भारतीय मजदूर संघाचा स्थापना दिवस उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

        भद्रावती शहरातील सुप्रसिद्ध जैन मंदिर येथील भारतीय मजदूर संघाद्वारे मंदिरात दिनांक 23 रोज बुधवार ला भारतीय मजदूर संघाचा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यानिमित्ताने भाजपचे शहर अध्यक्ष तथा मजदूर संघाचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. सुनील नामोजवार, अध्यक्ष मधुकर नागपुरे, सचिव संदीप घोटेकर, सहसचिव वैशाली डांगे,विठ्ठल जगताप,अरुण सिडाम, सतीश मोगरे, मुकेश मिश्रा आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी एडवोकेट सुनील नामोजवार यांनी उपस्थितांना भारतीय मजदूर संघाच्या स्थापना दिनाविषयी व संघाच्या वाटचाली विषयी माहिती सांगून मार्गदर्शन केले.

अन्य मान्यवरांनी सुद्धा यावेळी आपापले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाला जैन मंदिर येथील भारतीय मजदूर संघाचे पदाधिकारी तथा सदस्य व कामगार मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये