“मुख्यमंत्री सहाय्यता निधी” मध्ये बँकेतर्फे रु.२५.०० लाखाचा निधी वितरीत करण्यात आला

चांदा ब्लास्ट
चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या., चंद्रपुर तर्फे मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना “मुख्यमंत्री सहाय्यता निधी” करीता रु.२५.०० लाखाचा धनादेश बॅकेचे मा. अध्यक्ष महोदय श्री. रविंद्र श्रीनिवासराव शिंदे, मा. उपाध्यक्ष महोदय श्री. संजय गुलाबराव डोंगरे यांचेहस्ते देण्यात आला. त्यावेळी मा. श्री. किर्तीकुमार भांगडिया, आमदार चिमुर विधानसभा क्षेत्र, मा. श्री. किशोरभाऊ जोरगेवार, आमदार, चंद्रपुर विभानसभा क्षेत्र, मा.श्री. करण संजय देवतळे, आमदार, वरोरा विधानसभा क्षेत्र तसेच बँकेचे नवनिर्वाचित संचालक श्री. रोहीत चरणदास बोम्मावार, श्री. यशवंत तुकारामजी दिघोरे, श्री. निशिकांत राजेंद्र बोरकर, श्री. सुदर्शन भगवान निमकर, माजी आमदार, श्री. जयंता मोरेश्वर टेंभुर्डे, श्री. दामोधर श्रावणजी मिसार, श्री.प्रा.डॉ. ललित काशिरामजी मोटघरे, श्री. गजानन वासुदेव पाथोडे, श्री. गणेश जयराम तर्वेकर, श्री. उल्हास नागोरावजी करपे, श्री. आवेशखॉन अमानखॉन पठान व संचालिका सौ. नंदाताई वसंतराव अल्लुरवार सर्व संचालक व बँकेचे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री. राजेश्वर भि. कल्याणकर उपस्थित होते.