ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन साजरा 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत समर्थ कृषी महाविद्यालय, देऊळगाव राजा,राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत 22 जुलै रोजी शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे, संतोष खांडेभराड, पशुधन विकास अधिकारी डॉ. शिवाजी चिरफरे, प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे, प्रा. अरुण शेळके, श्रीकृष्ण गोशाळा ट्रस्टचे अध्यक्ष राजेश तायडे हजर होते.

सर्वप्रथम आमदार मनोज कायंदे यांनी गोमातेचे पूजन केले आणि देशी गाईंच्या संकेत घट होण्यामागे संकरित गाईंच्या तुलनेत असलेली कमी उत्पादन क्षमता यावर चर्चा केली तसेच देशी गाईंच्या संवर्धनाचे महत्त्व पशुजन्य उत्पादनाचे महत्त्व ग्राहकांना पटवून देऊन देशी गाय पशुपालकांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आवश्यक आहे असेही सांगितले. डॉ. शिवाजी चिरफरे यांनी सर्व गाईंचे लसीकरण केले. प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे यांनी देशी गाय व गाईपासून मिळणाऱ्या उत्पादनाचे महत्त्व व देशी गाईच्या दुधाची उपयुक्तता तसेच शेण आणि गोमूत्र यांचे महत्त्व विचारात घेऊन गाईस कामधेनु म्हणतात असे सांगितले व देशी गाईस राज्यमाता, गोमाता म्हणून घोषित केले आहे असे सांगितले.

याबाबत माहिती श्रीकृष्ण गोशाळा ट्रस्टचे अध्यक्ष राजेश तायडे यांनी गोशाळेविषयी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमास किशोर पटेल, अविनाश भावसार, रावसाहेब म्हस्के, संदीप म्हस्के, गणेश मीनासे,भरत खुरपे,डॉ. वाघमारे, डॉ. खरात, प्रमोद साबळे, मिलन गुप्ता, शुभम कायंदे, अक्षय ठाकरे, प्रदीप वाघ, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये