ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
देऊळगाव राजा शहराला 2 ते 3 दिवसाआड पाणी पुरवठा करा – सूरज हनुमंते

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा येथे खडकपूर्णा धरणातून पाणी पुरवठा योजना सुरू असून शहराला सद्यस्थिती मध्ये 19 ते 20 दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे, याचा त्रास विशेषतः महिलांना होत आहे, शहराला 2 ते 3 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा चे संयोजक सूरज हनुमंते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ ने मुख्याधिकारी अरुण मोकळ यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.
निवेदनावर संजय तिडके, संचित धन्नावत, योगेश डोणगावकर, सत्यनारायण पावले, कैलाश शेळके, रवींद्र शर्मा, ॲड राजू मांटे, डॉ शंकर तलबे, गोविंदराव बोरकर, प्रा यादव भालेराव सौ सविता पाटील, सुनीता सानप,, ज्योती ताठे व इतर नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत