‘छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्र गौरव पुरस्कार २०२५ ने शिवाजी राजे जाधव सन्मानित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यासाठी ‘छावा, भारत क्रांती मिशन साप्ताहिक आपला आवाज’ यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठित ‘छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्र गौरव पुरस्कार २०२५’ यावर्षी लखुजीराजे जाधव सिंदखेडराजा यांचे वंशज, आदरणीय श्री. शिवाजीराजे जाधव सिंदखेडराजा यांना जाहीर करण्यात आला
श्री. शिवाजीराजे जाधव यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या अतुलनीय आणि प्रेरणादायी कार्याची दखल म्हणून त्यांना हा योग्य सन्मान प्रदान करण्यात आला आहे. विशेषतः, त्यांच्या नेतृत्वाखालील ‘जिजाऊ महाअभिवादन यात्रे’ने समाजावर खोलवर सकारात्मक परिणाम घडवला आहे. गेल्या ३० वर्षांपासून सामाजिक कार्यात त्यांचे मोठे योगदान असून, त्यांनी सातत्याने सर्वसामान्य लोकांना मदत करण्याचे काम केले आहे.
त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे हजारो लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यात यश आले आहे, जी एक फार मोठी उपलब्धी आहे.
त्यांच्या दूरदृष्टी आणि समर्पित कार्याने समाजाला एक नवी दिशा मिळाली आहे, असे ‘छावा, भारत क्रांती मिशन’च्या वतीने कळविण्यात आले आहे.
या गौरवशाली पुरस्काराबद्दल ‘छावा, भारत क्रांती मिशन साप्ताहिक आपला आवाज’ परिवारातर्फे श्री. शिवाजीराजे जाधव यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे.
हा पुरस्कार २० जुलै रोजी नाशिक येथील कालिका माता मंदिर हॉल, जुना आग्रा रोड येथे आयोजित समारंभात श्री. शिवाजीराजे जाधव यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
‘छावा, भारत क्रांती मिशन साप्ताहिक आपला आवाज’ परिवाराने श्री. शिवाजीराजे जाधव यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.