ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भाजपा जनसंपर्क कार्यालय, कोरपना येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

आमचे नेते, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आज भारतीय जनता पार्टी कोरपना तालुकाच्या वतीने शहरातील जनसंपर्क कार्यालय तथा मा. आ. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. यास मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

सदर शिबीरस्थळी आवर्जून भेट देत रक्तदात्यांना प्रदेश कार्यालयाच्या वतीने प्राप्त शुभेच्छासंदेश पत्राचे स्नेहपूर्वक वितरण केले.

यावेळी माझ्यासमवेत जिल्हा महामंत्री विवेक बोढे, तालुकाध्यक्ष संजय मुसळे, शहराध्यक्ष अमोल आसेकर, पुरुषोत्तम भोंगळे, अरुण मडावी, प्रमोद कोडापे, विजय रणदिवे, ओम पवार, शशिकांत आडकिणे, रवी बंडीवार, अबरार अली, उमेश पालीवाल, विनोद नरेंदुलवार, कार्तिक गोण्लावार, दिनेश खडसे, पवन बुरेवार, दिनेश ढेंगळे, दिनेश सुर, तिरूपती किन्नाके, अजय तिखट, सतीश जमदाडे, संजय नीत, आशिष देवतळे, किशोर बावणे, सागर धुर्वे, अल्का रणदिवे, वर्षा लांडगे, अनिता कडीवार, जोश्ना वैरागडे, प्रमोद पायघन, जगदीश पिंपळवार, सुदाम लांडे, नागोराव आत्राम, सचिन भोयर आदिंची प्रामुख्याने उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये