युवक युवती साठी अल्ट्राटेक आवारपुर तर्फ़े MS-CIT प्रशिक्षण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, आवारपुर आपल्या सामाजिक दायित्वांच्या कार्याद्वारे शिक्षणाची गुणवत्ता आणि आधुनिक सुविधाच्या विकासात सदैव तत्पर आहे. विद्यार्थ्यांची गरज आणि संगणकाचे, अल्ट्राटेक आवारपुर तर्फे MS-CIT प्रशिक्षणाचे उद्घाटन करण्यात आले. प्रशिक्षणाचे उद्घाटन ग्रामपंचायत नांदा गावचे उपसरपंच श्री. पुरूषोत्तम आस्वले यांच्या हस्तेकरण्यात करण्यात आले.
या कार्यक्रमाला श्री. किरण करमरकर (विभाग प्रमुख), श्री. प्रतीक वानखेडे, नांदा ग्रामपंचायत चे सदस्य श्री. रत्नाकर चटप, हिरापूर ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री. अरुण काळे, आवारपूर ग्रामपंचायत चे उपसरपंच श्री. बाळकृष्ण काकडे व मोहर्ष कम्प्युटर इन्स्टिट्यूट चे शिक्षक श्री. गणेश पिंपळकर सोबत संगणक प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचीही उपस्थिती होती. या MS-CIT संगणक प्रशिक्षणामध्ये सभोवताली गावातील एकूण १०० विद्यार्थ्यांना पायाभूत संगणकज्ञान, MS ऑफिस आणि इंटरनेट एक्सप्लोरर याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सोबतच परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सरकारमान्य प्रमाणपत्र सुद्धा प्रधान करण्यात येणार आहेत.