ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लोकमान्य टिळक विद्यालय कथा कनिष्ठ महाविद्यालयात डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन

चांदा ब्लास्ट

             डिजिटल क्लासरूम म्हणजे माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाचा (ICT) वापर करून शिकण्याचा अनुभव वाढवणारे, आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले शैक्षणिक वातावरण. यात डिजिटल बोर्ड, इंटरनेट, शैक्षणिक सॉफ्टवेअर आणि इतर डिजिटल उपकरणांचा वापर केला जातो. यामुळे विद्यार्थ्यांना अधिक प्रभावीपणे शिकायला मदत होते आणि शिक्षकांना विविध संसाधनांचा वापर करून शिकवण्याची संधी मिळते. डिजिटल क्लासरूममुळे शिक्षण अधिक प्रभावी, आकर्षक आणि सर्वांसाठी सोपे होऊ शकते. त्यामुळेच लोकमान्य टिळक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात डिजिटल क्लासरूम सुरू करण्यात आली आहे.

दिनांक 19 जुलै 2025 लां शाळेचे उपमुख्याध्यापक मा.श्री. राजपुरोहित सर यांच्या हस्ते डिजिटल क्लासरूम चे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्याला शाळेच्या मुख्याध्यापिका मा. श्रीमती पाटील मॅडम, पर्यवेक्षक मा. श्री. जहागीरदार सर, सकाळ पाळीच्या पर्यवेक्षिका मा. सौ देगामवार मॅडम तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये