पिंपळगाव चिलमखा शिवारात शेतीच्या वादातून मारहाण
दोन आरोपी विरोधात गुन्हा दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
तालुक्यातील पिंपळगाव चिलमखा येथील शिवारात एका वृद्ध शेतकऱ्यास शेतीच्या वादातून दोघांनी जबर मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना 22 जून रोजी सकाळी अकरा वाजता घडली, घटनेची तक्रार 19 जुलै रोजी दाखल करण्यात आली असून पोलिसांनी 2 आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर वृत्त असे की, धोंडीराम त्र्यंबक लंके, वय 70 वर्षे हे पिंपळगाव चिलमखा शिवारात असताना आरोपी कुशीवर्ता केदारनाथ बोरकर व जेड्या केदारनाथ बोरकर शेतात येऊन ट्रॅक्टरने नांगरणी करू लागले, असता वृध्द शेतकऱ्याने तुम्ही येथे नांगरणी करू नका असे म्हटले असता आरोपीने शिवीगाळ करून मारहाण केली, तसेच वृद्ध शेतकऱ्याचा मोबाईल तोडला,व जिवे मारण्यची धमकी दिल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून. पोलिसांनी दोन्ही आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोहेका बद्रीनाथ डीघोळे करीत आहे.