ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“मुख्यमंत्री सहाय्यता निधी” करीता डॉ. अशोक जीवतोडे यांनी दिला धनादेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आवाहनाला प्रतिसाद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचे जाहिराती, होर्डिंग्ज, फ्लेक्स, बॅनर्स, पुष्पहार व गुच्छ यावर खर्च न करता, वृत्तपत्र किंवा टिव्हीवर जाहिराती न देता, ती रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला द्यावी, सेवा मदत आणि समाजहिताची भावना जोपासा, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अशोक जीवतोडे यांनी “मुख्यमंत्री सहाय्यता निधी” करीता एक लाख एक्कावन हजार रुपयांचा धनादेश आज (दि.२१ जुलै) ला प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी डॉ. विनय गौडा यांच्याकडे स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयात सुपूर्द केला.

दिनांक २२ जुलै ला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे. हा वाढदिवस कोणतेही मोठे उत्साही कार्यक्रम न घेता साधेपणाने साजरा व्हावा. सामान्य नागरिकांना मदत व्हावी या हेतूने “मुख्यमंत्री सहाय्यता निधी” मधे दानशूर व्यक्तींनी आर्थिक मदत द्यावी, हा हेतू आहे.

महाराष्ट्र राज्यातील तसेच देशातील आपत्तीग्रस्तांना तातडीने सहाय्यता देणे, हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे उद्दिष्ट आहे. पूर, दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात अशा मोठ्या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधीत नागरिकांना “मुख्यमंत्री सहाय्यता निधी” मार्फत अर्थसहाय्य पुरविले जाते. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठीही या निधीतून अर्थसहाय्य पुरविले जाते.

डॉ. अशोक जीवतोडे नेहमीच सामाजिक उपक्रम राबवित गरजूंना मदतकार्य करीत असतात. चांदा शिक्षण प्रसारक मंडळातर्फे आत्महत्याग्रस्त, कोविडग्रस्त पालकांच्या विद्यार्थ्यांना संस्थेच्या कोणत्याही शाखेत निःशुल्क प्रवेश दिल्या जात असतो. विविध कार्यक्रम घेतल्या जात असतात. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला त्यांनी या निमित्ताने प्रतिसाद देत सदर धनादेश राज्य शासनाकडे सुपूर्द केला आहे. यावेळी त्यांचे निकटवर्तीय संजय सपाटे, शंकरराव सुकळकर, ओबीसी पदाधिकारी नितीन कुकडे, डॉ. आशिष महातळे, रवि देवाळकर, रविकांत वरारकर, महेश यार्दी, विष्णु ठाकरे, रवि जोगी, सुनील मुसळे, संदीप माशिरकर, राहुल देशमुख, तथा भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये