देऊळगाव महीत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लढा उभारणारे व आपल्या शाहीरीतून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सातासमुद्र पार गायणारे लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या 56 व्या स्मृतीदिना निमित्त साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विचार मंच देऊळगाव महीच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या प्रांरभी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षा गजराबाई वाघमारे यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला हारअर्पण व पुष्प पूजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले कीर्तनकार ह.भ.प दत्तात्रय महाराज गिरी मेहकर,व पोस्ट मास्टर रामदास गिऱ्हे पत्रकार संतोष जाधव, किरण जोगदंड यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.
यावेळी होमगार्ड अधिकारी रमाकांत जोगदंड, जयंती उत्सव समितीचे उपाध्यक्ष रामदास साळवे, प्रदीप अवसरमोल, हरीश वाघमारे,रामदास खंदारे, राहुल साळवे, राजू मरमट, अनिकेत अवसरमोल,संदीप जोगदंड यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.