देवराव तानबाजी बोबडे देहदान संकल्प पुरस्काराने सन्मानित

चांदा ब्लास्ट
राऊत ले-आऊट तुकूम येथे वास्तव्यास असलेले गुरुदेव सेवा मंडळाचे ज्येष्ठ सेवाधिकारी देवराव तानबाजी बोबडे यांना नुकतेच देहदान संकल्प पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गुरुदेव सेवा मंडळ राऊत ले-आऊट तुकूम आणि बोबडे परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुदेव सेवा मंडळाच्या सक्रिय पदाधिकारी स्मृतिशेष मायाताई बोबडे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या प्रबोधनपर श्रद्धांजली कार्यक्रमात अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती चंद्रपूरच्यावतीने नुकताच देण्यात आला.
सदर देहदान संकल्प पुरस्कार देवराव बोबडे यांना सामाजिक कार्यकर्ते सुभाष कासनगोट्टूवार आणि चंद्रपुरातील रक्तदान नेत्रदान व देहदान चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते प्रदीप अडकिने यांच्या हस्ते संयुक्तरित्या देण्यात आला. अडकिने व कासनगोट्टूवार यांनी उपस्थितांना बोबडे यांचा देहदान संकल्पाचे कौतुक करून आपणही देहदान करून आपले शरीर उपयोगी आणण्याचा सल्ला दिला.
याप्रसंगी पुरुषोत्तम राऊत, स्वाती साळवे, मधुसूदन टोंगे, संजय बोबडे, शौर्य टोंगे, रुद्रानी साळवे, अन्वी साळवे, उज्ज्वला बोबडे, अश्विनी बोबडे, मनीषा टोंगे, सारंग साळवे, यश टोंगे, दयाराम नन्नावरे आणि मंजूषा कासनगोट्टूवार तसेच गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन रामराव धारणे यांनी केले.