प्रियदर्शिनी कन्या विद्यालयात पालक सभा व शालेय बस परिवहन समितीची संयुक्त सभा यशस्वीरित्या संपन्न

चांदा ब्लास्ट
घुग्घुस, चंद्रपूर – प्रियदर्शिनी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, घुग्घुस येथे दिनांक 18 जुलै 2025 रोजी पालक सभा व शालेय बस परिवहन समितीची संयुक्त बैठक उत्साहात पार पडली.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनु चोथे होत्या. तसेच मंचावर पर्यवेक्षक खमणकर, यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून गणेश खापरामकर, दुर्गा चौरे (सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक), पोलीस उपनिरीक्षक अनभुले, प्रमुख पाहुणे अशराफ शेख, ज्योती सिडाम आदी उपस्थित होते. गावातील अनेक पालकांनीही यावेळी उपस्थिती लावली.
बैठकीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शालेय बस सेवेबाबत सखोल चर्चा झाली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी बसमध्ये असणाऱ्या आवश्यक सुविधांबाबत माहिती दिली. बसमधील GPS ट्रॅकर, फर्स्ट एड बॉक्स, फायर एक्सटिंग्विशर, सीसीटीव्ही यांसारख्या बाबी अनिवार्य असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वाहतूक नियम, सायलेन्सर अडकल्यास होणारे धोके, मोबाईल वापरू नये याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
दुर्गा यांनी देखील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पालकांनी व बस चालकांनी कोणती काळजी घ्यावी याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांचे अनुभव शेअर करत शाळेची जबाबदारी पालकांबरोबर सामायिक असल्याचे स्पष्ट केले.