ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जि.प. लालगुडा शाळेचा दप्तर मुक्त शाळा उपक्रम ठरतोय प्रेरणादायी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

कोरपना: कोरपना तालुक्यातील लालगुडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा दप्तर मुक्त शाळा उपक्रम इतर शाळेसाठी प्रेरणादायी ठरला असून शालेय बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन उपक्रम राबवले जात आहेत.शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश बोबडे व उपक्रमशील शिक्षक गोविंद पेदेवाड यांच्या तर्फे दर शनिवारी मुलांसाठी बौद्धिक मेजवानी ठरलेली असते.

दैनंदिन अभ्यासाबरोबरच शालेय उपक्रमात मुलांनी सहभागी होऊन सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने अवांतर वाचन, चित्र रंगवणे, भेट कार्ड तयार करणे, राखी तयार करणे,मातीकाम,परसबाग स्वच्छता, पर्ण कोलाज,कागदी पिशव्या तयार करणे,शब्दात लपलय कोण,भाषिक खेळ,गणितीय कोडे या सारखे उपक्रम राबवले जातात.विशेष बाब म्हणजे शालेय विद्यार्थी प्रत्येक उपक्रमात आनंदाने सहभागी होतात.

            या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कला कौशल्याचा विकास होत असल्याचे शाळेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष फकरू मरस्कोल्हे यांनी तर ग्राम पंचायत सदस्य मंगेश धुर्वे यांनी शाळेचा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये