शेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षावर गुन्हा दाखल करा – शिवसेनेची मागणी

चांदा ब्लास्ट
घुग्घुस, चंद्रपूर : येथील …शेती सहकारी पत संस्था मर्यादित यांच्या विरोधात नागरिकांनी गंभीर आरोप करत, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी संबंधित अध्यक्षावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. संस्थेकडून कोणतीही पूर्वसूचना न देता गरीब कुटुंबांच्या घरी जाऊन महिलांना पोलिसांच्या मदतीने घेराव घालून जबरदस्तीने कर्जाची वसुली व मालमत्ता जप्त करण्याच्या कारवायांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २०११- १२ मध्ये गरजू नागरिकांना पतसंस्थेने५०,०००/ कर्ज वाटप केले होते. आणि काही लाभार्थ्यांनी जवळ जवळ 70 ते 80 हजार रुपये परत केले आहे. तरी या लाभार्थ्यांकडून संस्थेने आता दीड ते दोन लाखाची रक्कम व्याजदरासह वसुली सुरू केली आहे. यासाठी पोलिसांची मदत घेत बळजबरीची भूमिका घेतली जात असल्याचा आरोप आहे.
कर्जदाराचा मृत्यू झाला असून सुद्धा त्यांचा वारसान कुटुंबाकडून या दुःखाचा स्थिती मध्ये पतसंस्था अध्यक्ष व कर्ज वसुली अधिकारी यांचा मार्फत बढजबरी करून कर्ज वसुली करत आहे. हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे.
या प्रकारावर तीव्र प्रतिक्रिया देताना शिवसेना (उबाठा) पक्षाचे अमित बोरकर, गणेश उईके, व मारोती जुमनाके यांनी तत्काळ हस्तक्षेप करत पोलिस विभागाशी चर्चा केली. त्यांनी पीडित नागरिकांसोबत चंद्रपूर जिल्हाधिकारी, सहायक दुय्यम निबंधक सहकारी संस्था, तालुका चंद्रपूर व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली व कायदेशीर तक्रार दाखल करण्याची मागणी केली.
अमित बोरकर यांनी स्पष्ट इशारा दिला की, “जर पुढील सात दिवसांत संबंधित अध्यक्ष व संस्थेविरोधात कारवाई झाली नाही, तर शिवसेना (उबाठा) जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”
या वेळी माजी ग्रा.पं.सदस्य गणेश उईके, मारोती जुमनाके, वनिता निहाल, शारदा पोनाला, आणि आमराई वॉर्डातील पीडित नागरिक आणि इतर शिव सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्थानिक नागरिकांनी या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.