फळ पिकांमध्ये खतांचा वापर केल्यास उत्पन्न वाढीस मदत होईल
कृषी विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
समर्थ कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गिरोली बुद्रुक येथे प्रत्यक्षात शेतात जाऊन खतांचा वापर फळ पिकांवर करण्याचे नियोजन सांगितले व त्यामुळे पिकाची काळजीपूर्वक वाढ होईल. आणि उत्पन्न वाढेल अशी माहिती देऊन प्रात्यक्षीक शेतकऱ्यांना पटवून सांगितले. यावेळी समर्थ कृषी महाविद्यालयातील मृदा विज्ञान विभाग प्रमुख प्रा.विलास सातपुते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
गावातील प्रत्येक शेतकऱ्यांने फळ पिकाची योग्य ती काळजी घ्यावी. असे मार्गदर्शन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन मेहत्रे व कार्यक्रम समन्वयक प्रा. मोहितजीत सिह राजपूत यांचेही मार्गदर्शन शेतकऱ्यांना लाभले. यावेळी विद्यार्थी योगेश पायघन, योगेश शेळके, विवेक तिडके, ज्ञानेश्वर वाघ, तेजस सपकाळ, रोहन ताठे, राम उबाळ, ऋषिकेश राऊत, अनिकेत ठाकरे, ओम साखळकर राम उबाळे यांनी उपक्रमात सहभाग घेतला.