चंद्रपूरचा देवांशू शिंगरू तबला विशारद परीक्षेत मतिमंद मुलांच्या गटात देशात प्रथम

चांदा ब्लास्ट
चंद्रपूरचा विशेष बालक व उदायोनमुख तबला वादक देवांशू शिंगरू हा अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालया तर्फे घेण्यात येणाऱ्या तबला विशारद परीक्षेत मतिमंद मुलांच्या गटात नवीन अभ्यास क्रमात भारतातुन प्रथम आला आहे. प्रविण्यासह देवांशू शिंगरु याने तबला विशारद परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
चंद्रपूर, कळंब, लाखनी अशा अनेक ठिकाणी त्याने सादरीकरण केले आहे. तसेच गोवा येथे “इंटरनॅशनल पर्पल फेस्टिवल” मध्ये जगभरातून आलेल्या प्रेक्षकांनी त्याच्या कलेचे कौतुक केले. देवांशूने केवळ दिव्यांगांमध्येच नव्हे, तर सर्वसामान्य मुलांमध्ये सुद्धा आपली छाप सोडली आहे. “कला प्रसारक” या सामान्य मुलांसाठी असलेल्या कार्यक्रमातही त्याने पुरस्कार प्राप्त केले आहे.
वाद्य वादनात पारंगत असतानाच, देवांशु स्विमिंगमध्ये सुद्धा उत्तम आहे. मालवण येथे झालेल्या देशपातळीवरील सी स्विमिंग स्पर्धेत त्याला ब्रॉंझ मेडल मिळाले. त्याचबरोबर स्पेशल ऑलिम्पिक ऑस्ट्रेलियासाठी त्याची निवड झाली होती,.
परंतु कोरोनामुळे ती स्पर्धा होऊ शकली नाही. अन्यथा त्याने तिथेसुद्धा देशासाठी एखादे पदक नक्कीच जिंकले असते. देवांशू सध्या पुण्यात दत्तात्रय भावे यांच्या कडून तबला वादनाचे धडे घेत आहे. देवांशूच्या या यशा बद्दल येथील सांस्कृतिक क्षेत्रात त्याचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.