ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आदर्श महाविद्यालयात कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

आदर्श महाविद्यालय, सिनगाव जहांगीर येथे 17 जुलै रोजी विधी व न्याय विभाग च्या वतीने अॅड.श्री.संतोषराव डोईफोडे यांचे सहकार्याने विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले.विशेषत: मुलींच्या स्वसंरक्षणासाठी घ्यावयाची काळजी.याकरीता सरकारने बनविलेले नवनवीन कायदे त्यांच्या उपयुक्ततेची माहिती दिली.

जनसेवा सामाजिक संघटना, देऊळगाव राजा चे सचिव गोविंदराव बोरकर यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक एकतेचे संरक्षण हे आपल्या सर्वांना समानतेच्या न्यायाने करावयाचे आहे.त्याकरीता आपण प्रथमतः घरातून सुरुवात केली पाहिजे.विचारांची देवाणघेवाण शक्य तितक्या जास्तीत जास्त लोकांशी केली पाहिजे,एकत्रित जेवणं झाल्यामुळे घराचा एकोपा टिकून राहतो. चांगले संस्कार होतातअसे सांगितले .

अनाथ मुलांना आधार कार्ड नसल्यामुळे शासकीय योजनेचे लाभ मिळविण्यात अडचणी येतात. याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.ढाकणे, जनसेवा सामाजिक समिती व देऊळगाव राजा तालुका सेवा निवृत्त कर्मचारी संघटना देऊळगाव राजाचे अध्यक्ष श्री बळीराम मापारी मामा, प्राध्यापक वृंद, विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये