ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा शहरात सुरू असलेला विजेचा लपंडाव बंद करण्याची भाजपाची मागणी

वीज वितरण कंपनीचे कर्मचारी ग्राहकांची आर्थिक लूट करीत असल्याचा आरोप

 चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 देऊळगाव राजा शहरात गेल्या तीन ते चार महिन्यापासून वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराने सतत कोणतेही ठोस कारण नसताना विजेचा लपंडाव सुरू आहे थोडी जरी हवा सुटली की शहराचा विद्युत पुरवठा बंद होऊन जातो या विजेच्या लपंडावामुळे व्यापारी वर्ग व केवळ विद्युत जोडणीच्या भरवशावर ज्यांचा उदरनिर्वाह चालतो अशा परिवारावर उपासमारीची वेळ वीजतरण कंपनीने आणून सोडली आहे.

यासाठी भाजपाने पुढाकार घेत येथील वीज वितरण कंपनीचे अभियंता यांना निवेदन देऊन शहरात सुरू असलेला विजेचा लपंडाव त्वरित बंद करावा अन्यथा भाजपा युवा मोर्चाच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या कार्यालया समोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलेला असून वीज वितरण कंपनीचे कर्मचारी हे खाजगी वायरमन कडून कंपनीचे ग्राहक असलेल्या वीज ग्राहकांचे काम करून घेत आहे.

यामध्ये वीज ग्राहकाकडून अव्वाच्या सव्वा रुपये उकळत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे व वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर संबंधित अभियंत्यांचा वचक राहिला नसल्याचे नमूद करण्यात आलेले आहे निवेदनावर भारतीय जनता युवा मोर्चाचे सुरज हनुमंते भाजपाचे राजेश भुतडा,संचित धन्नावत, डॉक्टर शंकर तलबे, शहराध्यक्ष संजय तिडके, लोकेश डोणगावकर, मयूर पुजारी, प्रवीण धन्नावत, धर्मराज हनुमंते, यादवराव भालेराव, श्याम बनकर, साईनाथ नागरे, संदीप आंधळे सह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षरी आहेत

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये