ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

फाटक क्रमांक 39F च्या दुरुस्तीमुळे रस्ते वाहतूक बंद

चांदा ब्लास्ट

घुग्घुस, चंद्रपूर : घुग्घुस परिसरातील रेल्वे फाटक क्रमांक 39F ची दुरुस्ती (ओव्हरहॉलिंग) करण्यात येणार असून यामुळे काही दिवस रस्ते वाहतूक प्रभावित होणार आहे. प्राप्त माहितीनुसार, ही दुरुस्ती 17 जुलै 2025 पासून सुरू होऊन 20 जुलै 2025 च्या सायंकाळी 6 वाजेपासून पुढील दिवशी म्हणजेच 21 जुलै रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत चालणार आहे.

या काळात संबंधित रेल्वे फाटक पूर्णपणे बंद राहणार असून फाटकाचा दरवाजादेखील दुरुस्त केला जाईल. नागरिकांनी वैकल्पिक मार्गांचा वापर करावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हे काम प्रवाशांच्या सुरक्षितता आणि सोयीसाठी हाती घेण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये