ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाढती लोकसंख्या भारत देशासाठी चिंतादायक _ डॉ. मोहन कापगते

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

“वाढती लोकसंख्या देश विकासासाठी मारक असून, भारताला महासत्ता म्हणून जगासमोर जाण्यास अडसर ठरू शकते. एकविसाव्या शतकात पदार्पण करूनही आपल्या देशातील लाखो सर्वं सामान्य जनतेचे अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत गरजा पूर्ण होऊ शकल्या नाहीत. ‘हम दो हमारा एक’ हा नारा आता द्यावा लागेल तेव्हाच वाढत्या लोकसंख्येला आळा बसेल,” असे विचार डॉ. मोहन कापगते यांनी व्यक्त केले, ते नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

  लोकसंख्या शिक्षण मंडळ आणि राष्ट्रीय सेवा योजना या विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक लोकसंख्या दिनाच्या कार्यक्रमात व्यासपीठावर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. एस. एम. शेकोकर, प्रमुख अतिथी कलाशाखा प्रमुख

डॉ. राजेंद्रकुमार डांगे, रासेयो प्रमुख डॉ. प्रकाश वट्टी तर लोकसंख्या शिक्षण मंडळाचे प्रमुख डॉ. पद्माकर वानखडे उपस्थित होते.

    या प्रसंगी डॉ. राजेंद्र डांगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषण प्राचार्य डॉ. एस. एम. शेकोकर यांनी केले.कार्यक्रमाचे संचालन डॉ. पद्माकर वानखडे यांनी तर आभार प्रा. बंडू गेडाम यांनी मानले.

    कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. धनराज खानोरकर, डॉ. भास्कर लेनगुरे, डॉ. अजित खाजगीवाले, डॉ. मिलिंद पठाडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला बहुसंख्य प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये