कृषिकपन्यांनी सांगितले मूल्यवर्धित उत्पादनाचे मूल्य

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत कार्यरत समर्थ कृषी महाविद्यालय देऊलगाव राजा येथील अंतिम वर्षातील कृषीकन्यांनी मूल्यवर्धित उत्पादन या डेमो मध्ये पपया या फळावर केमिकलचा वापर न करता प्रक्रिया करून पपया जाम बनवला….
अगोदरच्या दिवशी पपया जाम बनवून तो दुसऱ्या दिवशी उंबरखेड या गावात नेऊन गावकऱ्यांना त्याच्याबद्दल माहिती देऊन त्यांना वितरित केला
यावेळी गावातील बऱ्याच महिला तिथे उपस्थित होत्या त्यावेळी कृषीकन्यांनी आपण शेतीबरोबर फळबागेची उत्पादन घेऊन कशाप्रकारे आपला फावला वेळ आपण इथे वापरून आपल्या आंतर्भुत गुण जगाला दाखवू शकतो व एक छोटा व्यवसाय उभारू शकतो, आणि समजा पुढे एक आदर्श महिला म्हणून आपली ओळख निर्माण करू शकतो हे सांगितले पपया जाम सोबतच केळीचे चिप्स व अजून अनेक अनेक असे फळांचे उपपदार्थ आपण बनवू शकतो व एक छोटा जोडधंदा सुरू करून आपला उदरनिर्वाह अजून चांगल्या प्रकारे करू शकतो.
हे प्रात्यक्षिक कृषी कन्यांनी समर्थ कृषी महाविद्यालय येथील प्राध्यापिका इंगळे मॅडम व तसेच रावे इन्चार्ज प्राध्यापक मोहजितसिंग राजपूत यांचे मार्गदर्शन घेऊन हा उपक्रम पार पाडला. यावेळी कृषी कन्यांमध्ये टीना जोडे, नेहा पडघान, श्वेता पवार, जयश्री पाटोळे, गायत्री शिंगणे, नेहा लहाने,दुर्गा मापरी, अंजली खिरडे, ऋतुजा वाघ यांचा समावेश होता.