
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा शहरातून गेलेल्या आमना नदीच्या खोलीकरणाला दहा वर्ष पूर्ण झाल्याने दशकपूर्ती सोहळा गुरुपौर्णिमा च्या दिवशी नदीवर 101 दिवे प्रज्वलित करुण साजरा करण्यात आला.
आमना नदीचे खोलीकरण करून सौंदर्यीकरण करण्याच्या कामासाठी तत्कालीन आमदार डॉ शशिकांत खेडेकर यांनी करोडो रुपये शासनाकडून आणून नगर परिषद च्या माध्यमातून विकास केला मात्र अजूनही या ठिकाणी सौंदर्यीकरण होणे बाकी आहे, नदीमधून गाळ काढून बोटिंग सुरु करण्यासाठी शासनाकडून निधी आणून सौंदर्यीकरण करण्याचे आश्वासन माजी आमदार डॉ. शशीकांत खेडेकर यांनी याप्रसंगी दिले.
सेवानिवृत्त उप जिल्हाधिकारी रमेश दादा कायंदे यांनी सांगितले की तत्कालीन नगर परिषद अध्यक्ष सौ मालतीबाई कायदे यांनी आमणा नदीच्या सौंदर्यीकरणसाठी पुढाकार घेऊन तत्कालीन आमदार डॉ शशिकांत खेडेकर यांच्या मदतीने, लोकांच्या सहभागातून खोलीकरण करून सौंदर्यीकरण करण्यात आले आहे, या साठी मुख्याधिकारी अरुण मोकळ यांचे महत्वपूर्ण योगदान लाभले आहे,मात्र अद्याप पूर्ण सौंदर्यीकरण झाले नाही बगीचा, बोटिंग चे काम पूर्ण झाले तर सर्वांना आनंद होईल असे सांगितले. यावेळी आमणा नदीला साडी चोळी, ओटी भरून, दिवे लाऊन पूजा करण्यात आली.
यावेळी माजी नगराध्यक्षा मालती बाई कायंदे, डॉ उषा खेडेकर, सौ संगीता मोगल, सौ मीना दराडे, गोपाल व्यास, विजय देव उपाध्ये, रामदास डोईफोडे, सुषमा राऊत, शितल खेडेकर, सौ सानप, सौ डॉ कायंदे, दिनेश चव्हाण, गणेश चव्हाण, बाळासाहेब शेजुळ, गणेश डोईफोडे, मयूर पुजारी, सलीम पठाण, पत्रकार अर्जुन आंधळे, सूरज गुप्ता, प्रा अशोक डोईफोडे, गणेश डोके, तथा इतर उपस्थित होते, आमना नदी चे उर्वरित सौंदर्यीकरण त्वरीत करावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.