वैरण्य चंद्रमौली आमुदला बनला सावली तालुक्यातला पहीला चार्टंड अकाऊन्टट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
सावली : स्थानिक राष्ट्रपिता महात्मा गांधी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय सावली येथील प्राचार्य तथा भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावलीचे सदस्य डाॅ. ए. चंद्रमौली यांचे चिरंजीव वैरण्य चंद्रमौली आमुदला हयाने वयाच्या २१ व्या वर्षी 2025 मध्यें झालेल्या भारतीय सनदी लेखापाल संस्था व्दारा घेण्यात आलेल्या (इन्स्टीटयुट आँफ चार्टड अकाऊंट आँफ इंडीया) परिक्षेत यश संपादन केले आहे. जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या बळावर यश संपादन केलेल्या वैरण्य चंद्रमौली आमुदला हयाने हैद्राबाद येथील अविनाश वाणिज्य महाविद्यालया मधून इयत्ता बारावी उत्तीर्ण केले.
बालपणापासून शिक्षणाची आवड असलेल्या वैरण्य चंद्रमौली आमुदला हयाने सावली तालुक्यामधुन पहिला चार्टंड अकाऊटंट बणण्याचे स्थान प्राप्त केले आहे. घेण्यांत आलेल्या परिक्षेत वैरण्य चंद्रमौली आमुदला हयाने अभ्यासक्रमातील फाऊंडेशन या विषयात प्राविण्य प्राप्त केले आहे. चार्टंड अकाऊंटच्या परिक्षेतील इंटरमिडीएट आणि फायनल या दोन्ही परीक्षेतील दोन्ही गृप मध्यें वैरण्यने पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले. त्यामूळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
वैरण्यने मिळविलेल्या यशाबद्दल भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संदीप गड्डमवार, सचिव राजाबाळ संगीडवार, उपाध्यक्ष नंदाताई अल्लुरवार, अनिल स्वामी, अंकुर बहुउद्देशिय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर गाडेवार यांचेसह अन्य पदाधिकारी आणि आप्तस्वकियांनी अभिनंदन केले असून उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.