पोलीस स्टेशन येथे जेष्ठ नागरिकांची सभा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
जेष्ठ नागरिकांसाठी शासनाने नविन कायदे तयार केले असून त्याची माहिती जेष्ठ नागरिकांना असावी यासाठी पोलिस ठाण्यात जेष्ठ नागरिकांची सभा उप विभागीय पोलिस अधिकारी मनिषा कदम यांच्या अध्यक्षतेखाली आज शुक्रवारी पार पडली
जेष्ठ नागरिकांसाठी असलेल्या कायद्याची सविस्तर माहिती मनिषा कदम यांनी दिली, जेष्ठ नागरिकांनी सायबर गुन्ह्यापासून सतर्क राहण्याचे आवाहन केले. ठाणेदार आशिष रोही यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. जेष्ठ नागरिक सेवानिवृत्त उप जिल्हाधिकारी रमेश कायंदे, प्रा विनायक कुळकर्णी, भावसार, आंबेकर, भंडारी यांनी जेष्ठ नागरिकांना शहरात भेडसावणाऱ्या विविध समस्या मांडल्या, सर्व समस्या दूर करण्यात येईल असे आश्वासन मनिषा कदम यांनी दिले.
सभेला तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटना चे अध्यक्ष मापारी मामा, सचिव गोविंदराव बोरकर, पंडीत पाथरकर, प्रकाश अहिरे,प्रा अशोक डोईफोडे तथा इतर उपस्थित होते
प्रा विनायक कुळकर्णी यांनी आभार मानले.