जि. प. टेकामांडवा शाळेचे पाच विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक

-चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्रशाळा टेकामांडवा ही विविध प्रकारच्या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे नेहमीच चर्चेत असते. यावेळी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (इयत्ता ५ वी) परीक्षेत एकूण १३ विद्यार्थी पात्र झालेले होते.त्यापैकी एकूण पाच विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झालेले आहेत. सर्व शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. दिपक गोतावळे यांच्या मार्गदर्शनाखाली कु पायल कुकडे, गंगाधर पांचाळ, कु जयश्री घोळवे यांच्या अथक प्रयत्नातून विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले आहे. शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांमध्ये तृप्ती फुलचंद तांबरे- २२२,कन्हैया नरहरी सोडनर-२२०,श्रेया सुभाष तांबरे -२१४,जानवी नागनाथ नुनुंचे-२०२,संध्या लक्ष्मण आईतवाड-२०२ यांनी हे यश संपादन केले आहे.
त्यांच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक लच्चू पवार, शाळा व्यवस्थापन समिती व सर्व पालक वृंद,केंद्रप्रमुख तसेच गटशिक्षणाधिकारी अमर साठे यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.