ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

गुरूंसाठी भावपूर्ण कृतज्ञतेचा कार्यक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त एक भावस्पर्शी आणि संस्कृतीमय कार्यक्रम अत्यंत उत्साहात व थाटात पार पडला. विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूजनांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करत विविध कलाप्रदर्शनांद्वारे गुरुपौर्णिमेला विशेष रूप दिले.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने करण्यात आली. या पावन कार्याचे उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. प्रियंका देशमुख उपमुख्याध्यापक आदरणीय फेजल अस्मानी शाळेचे सीईओ गुप्ता व प्राथमिक विभागाच्या प्रमुख प्रतीक्षा मॅडम यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी अभंग गायन, संस्कृत श्लोकपठण, गुरूंच्या कार्यावर आधारित नाटिका व भावनात्मक सादरीकरणाच्या माध्यमातून गुरूशिष्य परंपरेचे महत्व उलगडले. कार्यक्रमात मनीषा जगताप मॅडम यांनी गुरुपौर्णिमेचे ऐतिहासिक व अध्यात्मिक महत्व उलगडत मार्गदर्शन केले.

गुरू-शिष्य नात्यावर आधारित नाटिकेला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. यावेळी राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक डॉ. रामप्रसादजी शेळके व अध्यक्षा डॉ. मीनल शेळके यांची विशेष उपस्थिती लाभली. डॉ. रामप्रसाद शेळके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत गुरूंचे समाजातील स्थान अधोरेखित केले.

कार्यक्रमाचे अत्यंत प्रभावी सूत्रसंचालन पल्लवी संत मॅडम व पुष्पा माने मॅडम यांनी केले. आभारप्रदर्शन सुनीता टेकाळे मॅडम यांनी केले.

कार्यक्रमाच्या शेवटी सीईओ आदरणीय गुप्ता सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत गुरूंच्या योगदानाचे महत्व स्पष्ट केले. सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंना फुलांचे बुके देऊन सन्मानित केले. शिक्षकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंदाचे प्रतिबिंब स्पष्टपणे दिसत होते.

 राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये