ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शासनाने पिक कर्जाचे पुर्नगठन करून शेतकऱ्यांना कर्ज द्यावे-माजी आमदार प्रा.राजु तिमांडे 

शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत ; खरीप हंगामात जिल्ह्याला ९०० कोटी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

       पिक कर्जाचे पुर्नगठण करून शेतक-यांना खरीपाच्या हंगामासाठी सरकारने कर्ज देवुन दिलासा देण्याबाबत माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्हाधिकारी वर्धा यांना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.

      मे महिण्यात पावसाने सुरूवात करून शेतक-यांनी शेतीची मशागत केली.हवामान खात्याने मृग नक्षत्रात पाऊस चांगल्या प्रकारे येईल असा अंदाज जाहीर केला. त्यामुळे शेतक-यांनी लगबग करून मृग नक्षत्राच्या सुरवातीला कापुस, तुर, सोयाबीन इत्यादि पिकाची लागवड केली. परंतु मृग नक्षत्रात संपुर्ण १५ दिवसात डबंगेल पाऊस पडल्यामुळे शेतक-यांनी दुबार पेरणीचा सामना करावा लागला. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. बँकेकडुन उचललेल्या पिक कर्जाची रक्कम खर्च झाली असुन दुबार परिणीसाठी बि-बियाणेसाठी कुठुन पैसे आणायचे असा प्रश्न शेतक-या समोर उभा झाला आहे . त्यामुळे शेतकरी अस्माणी संकटात सापडला आहे.

     जिल्हाधिकारी यांनी कळविल्या प्रमाणे शेतक-यांना दरवर्षी दिल्या जाणा-या पिककर्जाची विहीत मुदतीत परतफेड करणे आवश्यक आहे. परंतु शेतक-यांना दुबार पेरणीचा सामना करावा लागल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.

      शेतकऱ्यांना दरवर्षी खरीप हंगामात पीक कर्जाची गरज भासते. बँकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करायची आणि पुन्हा कर्ज उचलण्यात येते. अनेक शेतकरी बँकांचे थकबाकीदार असल्याने कर्ज मिळवताना अडचणी सहन कराव्या लागतात. बँकांना दरवर्षी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात येते. यावर्षी देखील खरीप हंगामा करता वर्धा जिल्ह्यात ९०० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाच उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. पण सध्या तरी बँका पीक कर्ज वाटपाच्या उद्दिष्ट पासून दूरच असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात ३११ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप झाल्याची माहिती मिळते. वर्धा जिल्ह्यात चार लाख हेक्टरवर खरीप हंगामाचे क्षेत्र आहे. खरीप हंगामात कपाशी, तूर, सोयाबीन ही मुख्य पिके घेण्यात येतात. या सोबतच इतरही पिके घेण्यात येतात. शेती करिता शेतकऱ्यांना

पीक कर्ज काढावे लागते. खते, बियाणे आदी खरेदीच्या अनुषंगाने तसेच हंगामात लागणाऱ्या खर्चा करिता शेतकरी बँकांकडून कर्ज घेतात. नुकतीच पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतीच्या कामांना वेग आलेला आहे. त्यामुळे शेतीच्या कामाकरीता शेतकऱ्यांना पैशांची गरज भासू लागली आहे. अशा स्थितीत शेतकरी कर्ज मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक तंगीचा सामना करावा लागत आहे. मागील हंगामात सोयाबीन, कपाशीचे उत्पन्न कमी झाले सोबतच भाव देखील कमी

होते. इतरही पिकांच्या उत्पन आणि भावाबाबत जेमतेम परिस्थिती राहिली. खर्चात भरमसाठ वाढत पर होत आहे. खर्च करताना होत परतफेड करते देखील राज्य होत नाही. त्यामुळे काकीची संख्या आहे. अशा स्थितीत यावर्षीच्या खरीप हंगामात सद्यस्थितीत तरी कर्ज वाटप पासून दूरच असल्याचे दिसून येत आहे.

       तरी सरकारने शेतक-यांचे हित लक्षात घेता पिक कर्जाचे पुर्नगठन करून कर्ज देण्यात यावे अशी मागणी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्या वतीने करण्यात आली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये