ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर येथे पर्यावरण शास्त्र विभागातर्फे पीएम उषा अंतर्गत सॉफ्ट स्किल प्रशिक्षणाचे आयोजन

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयातील पर्यावरण शास्त्र विभागाद्वारे पीएम उषा अंतर्गत दहा विविध विषयांवर 23 जुलै ते 18 सप्टेंबर पर्यंत सॉफ्ट स्कील,( युनिट २ व युनिट ३) प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. हा प्रशिक्षण सोहळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पीएम काटकर, उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार, विषयातील तज्ञ श्रीमती मोहिनी पुनसे, श्री. देवानंद कुसुबे, विभाग प्रमुख डॉ.कविता रायपूरकर, प्रा. डॉ. राहुल कांबळे तसेच इतर प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पार पडला. या प्रशिक्षणांतर्गत Training on soil sampling and analysis, Participatory learning and action for rural sustainable development, Renewable energy resources for sustainable future, Analytical instrumentation technology for assessment of environmental pollutants, Biodiversity conservation and management, Management of single use plastic, Natural resources and their conservation, Wastewater analysis, Meteorology monitoring आणि Air pollution monitoring या दहा विषयांवर सदर विषयातील तज्ञ व्यक्तींनी सखोल मार्गदर्शन केले. तज्ञ व्यक्तीमत्वाद्वारे या प्रशिक्षणांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकसित करण्याच्या दृष्टीने हँडस ऑन ट्रेनिंग देण्यात आले. कौशल्य विकास विद्यार्थी तयार करणे हा उद्देश लक्षात घेऊन तज्ञ व्यक्तींनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले. प्रशिक्षणाच्या यशस्वी ते करिता विभाग प्रमुख प्रा. डॉ. कविता रायपूरकर, प्रा. डॉ. राहुल कांबळे, प्रा. पायल बांबोळे, प्रा. श्रद्धा आमगावकर, प्रा. सोनल पुणेकर, प्रा. प्रतिज्ञा चाहारे, श्री राजेंद्र वालदे, श्रीमती प्रमिला रंगारी यांनी अथक प्रयत्न केले.

सदर प्रशिक्षणासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपरोक्त उपक्रमाबद्दल सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्री अरविंद सावकार पोरडीवार, कार्यकारी अध्यक्ष श्री किशोर भाऊ जोरगेवार, उपाध्यक्ष श्री सुदर्शन निमकर, सचिव श्री प्रशांत पोटदुखे, सहसचिव तथा माजी कुलगुरू गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली मा. डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष श्री संदीप गड्डमवार व सन्माननीय सदस्य श्री राकेश पटेल, श्री एन रमजान, श्री सगुनाताई तलांडे व कार्यकारणी सदस्य श्री सुरेश पटेल तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर, उपप्राचार्य डॉक्टर एस व्ही माध्यमशेट्टीवार, पर्यावरण शास्त्र विभाग प्रमुख डॉ. कविता रायपूरकर तसेच विभागातील इतर प्राध्यापक यांनी यशाबद्दल अभिनंदन केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये