ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘शाश्वत विकास’ या विषयावर सरदार पटेल महाविद्यालयात व्याख्यान

चांदा ब्लास्ट

सरदार पटेल महाविद्यालयातील पर्यावरणशlस्त्र विभागाच्या वतीने शाश्वत विकास या विषयावर 22 नोव्हेंबर 2025 रोजी व्याख्यानाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.

या व्याख्यानाला प्राचार्य डॉ. प्रमोद एम. काटकर, प्रमुख वक्ते डॉ. योराम क्रोझर, टेवन्थ विद्यापीठ, नेदरलैंड, पर्यावरणशास्त्र विभाग प्रमुख प्रा. कविता रायपूरकर, प्रा. राहुल कांबळे यांची उपस्थिती होती.

या व्याख्यानात डॉ.योराम क्रोझर यांनी पर्यावरण आणि शाश्वत विकास या संबंधीत होणारे शाश्वत विकासाचे मुद्दे, शाश्वत विकास वाढीसाठी च्या संधी आणि शाश्वत विकासाचे नवे उपक्रम यासारख्या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तसेच अत्याधुनिक तंत्राच्या सहाय्याने विषयाचे योग्य आकलन होण्यास मदत होते, असे प्रतिपादन डॉ.योराम क्रोझर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागप्रमुख डॉ.कविता रायपुरकर यांनी केले, संचालन B. Sc. द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी कु. शीतल बडकेलवार हिने केले आणि आभार प्रदर्शन B. Sc. तृतीय वर्षाचा विध्यार्थी अभय प्रजापती याने केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.राहुल कांबळे, प्रा.पायल बांबोळे,प्रा.श्रद्धा आमगावकर, प्रा. सोनल पुणेकर,प्रा.प्रतिज्ञा चहारे,राजेंद्र वालदे, प्रमिला रंगारी यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये