पालडोह शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पालडोह ज्या शाळेची ओळख ३६५ दिवस चालणारी नाविन्यपूर्ण शाळा म्हणून केली जाते. या शाळेने नेहमी गुणवत्तापूर्ण काम केले आहे. या वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेत १० विद्यार्थी पात्र ठरले आहेत. त्यातून एकूण ६ विद्यार्थी हे शिष्यवृत्ती धारक झाले आहे.
मागील वर्षी या शाळेचा शिष्यवृत्तीचा निकाल १००% होता. त्यातून सात विद्यार्थी हे शिष्यवृत्ती धारक ठरले होते.तीच परंपरा कायम राखत या वेळी सुद्धा सहा विद्यार्थी हे शिष्यवृत्ती धारक ठरले आहे.
वर्ग ५ वा
१) राजश्री नागनाथ थाडगे – २२०
२)पृथ्वीराज विनायक आईतवाड
– २१८
३) नकुशा बालाजी पवार – २१०
४) सोनल नंदकिशोर आईतवाड
– १९८
५)योगिनी परमेश्वर माने – १९६
वर्ग ८ वा
१) माधुरी अंकुश रुंजे
हे विद्यार्थी या वर्षी शिष्यवृत्ती धारक ठरत त्यांनी शाळेचा मानाचा तुरा रोवला आहे.
यावेळी शाळेतील शिक्षक राठोड,आडे,खवशी,गाकरे,पानघाटेशाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र परतेकी तथा शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष,सदस्य व गावातील पालक यांच्याकडून विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन करण्यात आले.