मोटर सायकल चोरी करणाऱ्या आरोपीस अटक
मोटर सायकल किंमत ८० हजाराचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक २८/०५/२०२५ रोजी फिर्यादी नामे श्री. अजिक्य हेमंतराव चौधरी, वय २४, वर्षे, रा. राधानगर प्रतापनगर, वर्धा यांनी तकार दिली कि, दि. २७/०५/२०२५ रोजी दुपारी ०१/३० वा. चे दरम्याण त्यांची टि.व्ही.एस. कंपनीची रायडर १२५ मोटर सायकल क. एमएच ३२ ए.डोड. ११०१ ही बस स्थानक, वर्धा येथील कुरीअर ऑफीस समोर लावुन बस ची विचारणा करणे करीता गेले असता कुणीतरी अज्ञात चोरटयाने ती मोटर सायकल चोरून नेली अशा फिर्यादीचे तकार वरून पोलीस स्टेशन वर्धा (शहर) येथे अज्ञात आरोपी विरुध्द अपराध कमांक ८२७/२०२५ कलम ३०३(२) भारतीय न्याय संहीता २०२३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा कडून समांतर तपास करीत असतांना गोपनीय बातमीदारा कडुन खात्रीशिर माहीती मिळाली की, भद्रावती जिल्हा चंद्रपुर येथे राहणारा गौरव उर्फ गोलू मोहन जाधव, वय ३० वर्ष, रा. वार्ड क. ५, भंगाराम वार्ड, आंबेडकर शाळेजवळ, भद्रावती, ता. भद्रावती, जि. चंद्रपुर याने पोलीस स्टेशन वर्धा (शहर) परीसरातुन मोटर सायकल चोरी करुन घेवुन गेला आहे. अशा माहीतीवरून आरोपीस ताब्यात घेवुन मोटर सायकल चोरीबाबत सखोल विचारपुस केली असता त्याने अंदाजे एक महीना अगोदर बसस्थानक परीसर, वर्धा येथुन गुन्हयातील टि.व्ही.एस. कम्पनीची रायडर १२५ मोटर सायकल चोरी करुन ति अमरावती येथे नेवुन ठेवली आहे. अशी माहीती सांगितले
वरून आरोपीसह जिल्हा अमरावती येथे जावुन आरोपीचे ताब्यातुन गुन्हयात चोरीस गेलेली टि.व्ही.एस. रायडर १२५ कंम्पनीची सिमेंट रंगाची मोटर सायकल ज्यावर आरटीओ पासीग कमांक एम. एच. ३२ ए. झेड. ११०१ असा असलेली किंमत ८०,०००/- रु. ची जप्त करण्यात आलेला आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोलीस उप निरीक्षक राहुल ईटिकर, पोलीस अंमलदार नरेंद्र पाराशर, चंद्रकांत बुरंगे, भुषण निघोट, अमोल नगराळे, मंगेश चावरे, दिपक साठे, मिथुन जिचकार सर्व नेमणूक स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.