तालुक्यात झालेल्या पावसामुळे 55 घराची पतझड
तसेच 7 गोठ्याची पडझड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी तालुक्यातील दोन तीन दिवसाच्या अतिवृष्टी पावसामुळे शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांनी आता मोकळा श्वास घेण्यास सुरवात केली असल्याचे चित्र बघायला मिळाले. त्या आधी वैनगंगा नदीच्या पुरामुळे तालुक्यातील ओढे नाले सह तलाव बोड्या पूर्णतः तुडुंब भरून ओसंडून वाहत होते. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते.
याच दरम्यान ब्रम्हपुरी ते आरमोरी मार्ग आज सुरू झाला आहे.मात्र ग्रामीण भागातले सर्व रस्ते अजूनही बंदच आहेत.
यामध्ये शेतकऱ्यांची अंदाजे 200 हेक्टर शेत जमीन पाण्याखाली गेली असल्यामुळे ब्रम्हपुरी तालुक्यातील शेतकरी पार खचून गेलेला असून हवालदिल झाला आहे. परंतु शासन स्तरावरून पंचनामे करण्यास सुरवात झालेली आहे. काहि ठिकाणी पडझड झालेल्या घरांची व गोठ्याचे पंचनामे करणे सुरु आहे.
तालुक्यातील अकरा कुटुंबांना निवांऱ्यासाठी स्थलांतरित करण्यात आले. पाऊस कमी झाल्यावर त्यांना धान्य देऊ असे महसूल प्रशासनाचे अधिकारी तहसीलदार सतीश मासाळ यांनी सांगितले आहे.