ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक
आ. जोरगेवार यांनी बजावला मतदानाचा हक्क

चांदा ब्लास्ट
आज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीच्या अनुषंगाने आमदार किशोर जोरगेवार यांनी मतदानाचा हक्क बजावला. ही बँक जिल्ह्यातील शेतकरी आणि सहकार चळवळीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी ही संस्था महत्वपूर्ण भूमिका बजावत असते.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताकडे लक्ष देणारे, त्यांचे प्रश्न समजून घेणारे आणि त्यावर काम करणारे सक्षम संचालक निवडून यावेत, या दृष्टिकोनातून आमदार किशोर जोरगेवार यांनी मतदान केले आहे.