घुग्घुस नगर परिषदेत भाजप शिष्टमंडळाची मुख्याधिकाऱ्यांसोबत बैठक
नागरी समस्यांबाबत चर्चा

चांदा ब्लास्ट
घुग्घुस, चंद्रपूर – घुग्घुस नगर परिषद कार्यालयात गुरुवार, 10 जुलै रोजी भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्याधिकारी निलेश रांजणकर यांच्याशी महत्त्वपूर्ण बैठक घेतली. शहरातील विविध नागरी समस्यांवर चर्चा करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
बैठकीत पोलिस ठाण्यासमोर हायमास्ट लाईट बसवणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, रस्त्यालगत पथदिवे बसवणे, शहरातील सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती, तुकडोजी नगर येथील अंगणवाडी क्रमांक २४ व केमिकल नगरमधील सर्वे क्रमांक २०२ च्या खुल्या जागांवर भिंत बांधून सौंदर्यीकरण करणे, तसेच डेंग्यू प्रतिबंधक औषधांची फवारणी आदी विषयांवर चर्चा झाली.
मुख्याधिकारी निलेश रांजणकर यांनी शिष्टमंडळाला सर्व मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेऊन लवकरच उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन दिले.
या बैठकीस भाजयुमोचे अमोल थेरे, गणेश कुटेमाटे, चिन्नाजी नलभोगा, सिनू इसारप, बबलू सातपुते, तुलसीदास ढवस, इर्शाद कुरेशी, स्वप्नील इंगोले, मोगली लक्काकुला, सिनू कोत्तूर, मोमीन शेख, शंकर सिद्दम, हेमंत कुमार, योगेश घोडके, असगर खान, उमेश दडमल, गणेश राजूरकर, सुधाकर आसुटकर, सचिन राजूरकर, विनोद पिंपळशेंडे, अजय लेंडे, हनुमान खडसे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.