ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नकोडा गावात तीन दिवसांपासून पाणीटंचाई

तांत्रिक बिघाडामुळे जलपुरवठा ठप्प

चांदा ब्लास्ट

नकोडा (चंद्रपूर) – नकोडा गावात मागील तीन दिवसांपासून पाणीपुरवठा पूर्णतः बंद आहे, त्यामुळे ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

या भागात सतत मुसळधार पावसामुळे नदीचा पाणीसाठा वाढलेला आहे. अशा स्थितीत गावातील पाण्याच्या टाकीत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे संपूर्ण जलपुरवठा ठप्प झाला आहे.

ग्रामस्थांनी ठेकेदाराच्या हलगर्जीपणावर बोट ठेवले असून, तीन दिवस उलटूनही कोणतेही उपाययोजनांचे संकेत मिळालेले नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

या गंभीर परिस्थितीकडे लक्ष देणे गरजेचे असून, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी पाण्याच्या टाकीची व इतर संबंधित ठिकाणांची पाहणी करून तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

ग्रामस्थांनी त्वरित दुरुस्ती करून जलपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून त्यांना दिलासा मिळू शकेल.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये