जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक अध्यक्ष ॲड रजा यांचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
बुलढाणा जिल्हा काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्यांक आघाडी चे अध्यक्ष ॲड रजा यांचा देऊळगाव राजा तालुका व शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने आज दिनांक दहा जुलै रोजी सकाळी विश्राम गृह येथे सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ. इसरार, व श्री मेमन जाकीर यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. यावेळी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते रमेश दादा कायंदे, माजी नगरसेवक हनीफ शहा, तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष रामदास डोईफोडे, अयुब भाई, मतीन चाऊस, प्रकाश राजे जाधव, इरफान भाई, प्रा अशोक डोईफोडे, यश कासारे, नासेर भाई, पप्पू भाई, रवी पिंपळे, आकाश कासारे, तथा इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रदेश काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आपल्या जिल्ह्यातील असल्याने संपुर्ण काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना अभिमान आहे.
काँग्रेस पक्षाच्या बळकटी साठी सर्व नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे, तसेच नवीन कार्यकर्त्यांना संधी द्यावी असे आवाहन ॲड रजा यांनी केले .